एक नम्र निवेदन:
सर्व प्रथम स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शाळा, पालक व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!!!
आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे , की कै. ग. दि. माडगुळकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा व
कै. सदानंद चांदेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाल्यामुळे प्राथमिक फेरीचा रिझल्ट जाहीर करण्यास थोडा विलंब होत आहे.
प्राथमिक फेरीचा रिझल्ट सोमवार दि 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी खालील लिंक वर पोस्ट केला जाईल:
https://eventglint.com/balrangbhumi
धन्यवाद ... तसदी बद्दल क्षमस्व .. ऑनलाइन स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष असल्याने,आपण आम्हाला समजून घ्यावं हीच इच्छा...!!!
स्पर्धा कमीटी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा (अ. भा. म. नाट्य परिषदेची घटक संस्था)
व एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र, आयोजित
कै. ग. दि. माडगूळकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा व
कै. सदानंद चांदेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा
स्पर्धकांनी ५ ऑगस्ट पर्येंत आपले व्हिडिओ पाठवावे.
नाट्यछटेचा/एकपात्रीचा व्हिडिओ सलग चित्रित केलेला हवा तुकडे तुकडे किंवा एडिट केलेला नसावा.
८ ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरीचा व १५ ऑगस्ट रोजी अंतिम फेरीचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल.
सादरीकरणाचा कालावधी:
१ ली ते २ री - २ ते ४ मिनिटे
३ री ते ४ थी - २ ते ४ मिनिटे
५ वी ते ६ वी - ३ ते ५ मिनिटे
७ वी ते ८ वी - ३ ते ५ मिनिटे
प्रवेश फी: एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ७५ रुपये व दोन्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी १०० रुपये
प्रवेश घेण्याची व पैसे भरण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट २०२०
स्पर्धेचे नियम
नाट्य छटा म्हणजे काय:
एक महत्वाचे लक्षात ठेवा की नाट्यछटा म्हणजे नाट्यप्रवेश नाही, नाटकातील उतारा म्हणणे नाही, गोष्ट सांगणे नाही, गाणी म्हणणे नाही, तर एकट्या कलाकाराने आपण कुणाशी तरी बोलत आहोत असा अविर्भाव करत कोणतीही रंगभूषा, वेशभूषा यांचा वापर न करता केलेले सादरीकरण म्हणजे नाट्यछटा होय, या मध्ये जी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे तिचा अभिनय करणे अपेक्षित नाही, तर आपण त्या व्यक्तीशी बोलताना भूमिकेत समरस होऊन अभिनय करणे महत्वाचे आहे, हातात बाहुली घेऊन बोलण्यापेक्षा हातात बाहुली आहे असे समजून बोलणे हे अपेक्षित आहे, कमीत कमी पात्रांशी संवाद असल्यास तो अधिक परिणामकारक ठरतो.
एकपात्री प्रयोग कसा असावा:
1. संभाषण आहे, पण भाषण नव्हे, अभिनय आहे पण नाटक नव्हे, शब्द आहेत पण कथाकथन नव्हे, संगीत आहे पण गायन नव्हे म्हणजे एकपात्री प्रयोग.
2. रंगभूमीवर एकाच पात्राद्वारे कमीतकमी रंगमंचीय साधनसामुग्री वापरून इतर पात्रांच्या कायिक, वाचिक, अंगिक अभिनयाच्या लकबी, नकला, आवाजातील चढउतार या सर्वांचे एकत्रित सादरीकरण म्हणजे एकपात्री प्रयोग.
3. अनेक पात्रे असलेली संहिता एकाच व्यक्तीने भिन्न भिन्न आवाजातून अभिनयाद्वारे सादर करणे म्हणजे एकपात्री प्रयोग.
4. कथाकथन, नाटकातले स्वगत सादर करणे म्हणजे एकपात्री नव्हे, एकाच व्यक्तीने किमान 2 पात्रांचा आविष्कार फारशी तांत्रिक मदत न घेता करणे म्हणजे एकपात्री प्रयोग.
व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा:
https://eventglint.com/balrangbhumi
बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखेचा बँक खाते तपशील
सारस्वत को. ऑप. बँक लिमिटेड, डाहणुकर कॉलनी शाखा
खाता क्र: 066209100000077
IFSC Code: SRCB0000066
संपर्क:
अरुण पटवर्धन - 9423522991
नरेंद्र लवाटे - 7507433347