बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा (अ. भा. म. नाट्य परिषदेची घटक संस्था ) आयोजित
अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२१
स्पर्धकांनी २५ जुलै पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत.
नाट्यछटेचा व्हिडिओ सलग चित्रित केलेला असावा.तुकडे तुकडे किंवा एडिट केलेला नसावा.
३० जुलै रोजी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
१ ते ५ ऑगस्ट दरम्यान अभिनेत्री ऋजुता देशमुख अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधतील.
या संवादानंतर जर कुठल्या स्पर्धकाला आपल्या सादरीकरणाचा सुधारीत व्हिडिओ पाठवायचा असेल तर तो व्हिडिओ १० ऑगस्ट पर्यंत पाठवावा. तोच व्हिडिओ अंतिम फेरीला ग्राह्य धरला जाईल.
अंतिम फेरीचा निकाल १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल.
सादरीकरणाचा कालावधी:
१ ली ते २ री - २ ते ४ मिनिटे
३ री ते ४ थी - २ ते ४ मिनिटे
५ वी ते ७ वी - ३ ते ५ मिनिटे
८ वी ते १० वी - ३ ते ५ मिनिटे
प्रवेश फी: ७५ रुपये प्रति प्रवेश
प्रवेश फी व अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२१
प्रत्येक गटात 3 विजेते व 2 उत्तेजनार्थ बक्षीशे: सर्टिफिकेट आणि स्मृतिचिन्ह
स्पर्धेचे नियम:
१) स्पर्धा ग्रामीण व शहरी अशा दोन विभागात होईल.
२) तुमच्या शाळेच्या पत्त्यानुसार शहरी व ग्रामीण अशी विभागणी होईल.
३) स्पर्धा प्रवेश फी ऑनलाईन/ बँक खात्यात जमा करावी.
४) प्रमाणपत्र, शाळेच्या / शिक्षकांच्या ई - मेल आयडी वर पाठवले जाईल.
५) नवीन नाट्यछटेचे सादरीकरण केल्यास ती नाट्यछटा लेखन स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७) अंतिम फेरीत प्रत्येक गटातून प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ अशी पारितोषिक देण्यात येतील.
नाट्य छटा म्हणजे काय:
एक महत्वाचे लक्षात ठेवा की नाट्यछटा म्हणजे नाट्यप्रवेश नाही, नाटकातील उतारा म्हणणे नाही, गोष्ट सांगणे नाही, गाणी म्हणणे नाही, तर एकट्या कलाकाराने आपण कुणाशी तरी बोलत आहोत असा अविर्भाव करत कोणतीही रंगभूषा, वेशभूषा यांचा वापर न करता केलेले सादरीकरण म्हणजे नाट्यछटा होय, या मध्ये जी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे तिचा अभिनय करणे अपेक्षित नाही, तर आपण त्या व्यक्तीशी बोलताना भूमिकेत समरस होऊन अभिनय करणे महत्वाचे आहे, हातात बाहुली घेऊन बोलण्यापेक्षा हातात बाहुली आहे असे समजून बोलणे हे अपेक्षित आहे, कमीत कमी पात्रांशी संवाद असल्यास तो अधिक परिणामकारक ठरतो.
व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा:
https://eventglint.com/balrangbhumi
बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखेचा बँक खाते तपशील
सारस्वत को. ऑप. बँक लिमिटेड, डाहणुकर कॉलनी शाखा
खाता क्र: 066209100000077
IFSC Code: SRCB0000066
संपर्क:
देवेंद्र भिडे - 7420050297
हितेंद्र खडतरे - 9665532120